HW News Marathi
राजकारण

पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात !

मुंबई | “भाजप देशपातळीवर ‘मै भी चौकीदार’ नावाने अभियान राबवत आहे. परंतु कोणत्याही आरोपाला संवेदनशीलतेने उत्तर देण्याचे आत्मबळ भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले नाही. भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता भाजप केवळ पळ काढत आहे. पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात”,अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

“सत्तेत आल्यापासून भाजप विरोधी पक्ष, माध्यमे आणि न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांपासून पळ काढत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील दिलीप कांबळे या मंत्र्यांवर लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल आहे. लाचखोरीबद्दल त्यांची हकालपट्टी करण्याचे सोडाच परंतु त्याची दखल घेण्याची नैतिकताही भाजपमध्ये राहिलेली नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या चौकशीतील दिरंगाई व अकार्यक्षमतेबद्दल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणे तर सोडाच परंतु त्याला उत्तर देण्याचीही हिम्मत सरकारमध्ये नाही”, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

“माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न दिल्याने थोड्या दिवसांनी प्रश्न विचारणे बंद होईल आणि जनतेची स्मरणशक्ती कमजोर असते असे गृहीत धरून जनता हे विसरून जाईल. त्यानंतर पारदर्शकता व नैतिकतेचा टेंभा मिरवायला आपण मोकळे अशी कुटील नीती भाजप गेली काही वर्षे वापरत आहे. परंतु त्यांचा हा कोडगेपणा व राजकीय उन्माद काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात घेऊन जातच राहील. काही शरम असेल तर तात्काळ दिलीप कांबळेंची हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar

नातवाचा आजोबांकडे हट्ट, ‘साहेब’ निर्णयाचा पुर्नविचार करा !

News Desk

म्हणून अजित पवारांना मिळाले विरोधी पक्षनेते पद; ‘या’ भाजपच्या नेत्याचा दावा

Aprna