HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप शिवसेना युती तुटल्याने आठवले नाराज, आरपीआय आता भाजप ला साथ देणार

आरपीआय च्या नेत्यांची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई – भाजप-शिवसेना युती आवश्यक होती मात्र ती तुटल्याने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे . सेना-भाजप आरपीआय युती आवश्यक होती मात्र सेनेने काडीमोड घेतली असल्याने आगामी 10 महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाची भाजप सोबत अधिकृत युती राहील अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (ए) च्या नेत्यांनी आज रिपाइं च्या पक्षकार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली यावेळी रिपाइंचे मुम्बई अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते. सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपासून रिपब्लिकन पक्षाची भाजप सोबत युती आहे त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत रिपाइं (ए) ची भाजप सोबत युती राहील . राज्यात महत्वापूर्ण ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप ने 40 ते 45 जागा सोडाव्यात अशी मागणी रिपाइं ने केली आहे. सन 2012 च्या महापालिका निवडणुकीत रिपाइंला शिवसेना भाजप ने 29 जागा सोडल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत रिपाइंला भाजपने किमान 45 जागा सोडाव्यात अशी मागणी रिपाइं ने केली आहे .

राज्यात होत असलेल्या 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकांत भाजप सोबत युती करण्याचा पक्षाचा निर्णय झाला असुन जेथे रिपाइं सोबत समाधानकारक जागा वाटप होणार नाही तेथे रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूका लढेल मात्र कोणत्याही परिस्थितीत कुठेही काँग्रेस राष्ट्रवादी शी युती करणार नसल्याचे रिपाइं नेत्यांनी आज स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बस अपघातात ३५ विद्यार्थी जखमी

News Desk

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

News Desk

महाड तालुक्यातील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार; पुनर्वसनाला गती देण्याचे उपमुख्यमंत्र्याचे निर्देश

Aprna