HW News Marathi
मुंबई

साडेपाच वर्षाच्या मुलाला सावत्र बापाने दिले चटके

पुणे चिंचवड येथे खेळण्यासाठी न सांगता घराबाहेर गेला म्हणून आई आणि सावत्र वडिलाने साडेपाच वर्षाच्या मुलाला कागदाने चटके दिले. तसेच लाकडी काठीने आणि बुटाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आई-वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज याची आई कोमल बालाजी अष्टुळे (वय २६) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर सावत्र वडील किशोर लक्ष्मण बनसोडे (वय २६, रा. रामनगर, चिंचवड) याला ताब्यात घेण्यात आले.एकूणच एकाच आठवड्यात एका मागे एक बालकांवर अत्याचार होण्याच्या घटना सांस्कृतिक पुण्यात उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ झाल्याचे अधोरेखित होते आहे. तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न या निमित्ताने समोर येताना दिसतो. मात्र अशा गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेत, पोलिसांना मदत करत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk

काय कारण | उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत नियोजित बैठक तडकाफडकी रद्द झाली

News Desk

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Gauri Tilekar