HW News Marathi
मुंबई

एअर इंडियामध्ये 225 कोटींचा सॉफ्टवेअर घोटाळा ?

  • सीबीआय ने दाखल केला गुन्हा

अक्षय घुगे

मुंबई – एअर इंडिया कंपनीमध्ये सुमारे 225 कोटी रूपयांचा सॉफ्टवेअर घोटाळा उघडकीस आला असून सीबीआयने गुन्हा दाखल केला आला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने गुन्हा दाखल करत चौकशीची शिफारस सीबीआयस केली होती. वर्ष 2014 मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीनुसार कार्यवाही झाली आहे

केंद्रीय सतर्कता आयोगाने एअर इंडिया, सॅप एजी आणि आयबीएमच्या अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली आहे. गलगली यांना एअर इंडियाने कळविले होते की एअर इंडियाच्या संचालक मंडळाने याचा विचार करत निर्णय घेतला होता की एअर इंडियामध्ये सॅप ईआरपी प्रणाली कार्यान्वित करावी. डायरेक्टरोट जनरल ऑफ सप्लायस् अंड डिस्पोसल यांच्या दराप्रमाणे 225 कोटींची निश्चिती करण्यात आली, त्यामुळे जाहिरात दिली गेली नाही. अनिल गलगली यांनी याबाबतीत केंद्रीय दक्षता आयोगास तक्रार दाखल करत कार्यवाहीची मागणी केली होती. आयोगाने सर्व दस्तावेजाचा सखोल अभ्यास करत सीबीआयला गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली त्यानुसार सीबीआयने एअर इंडियाविरोधात गुन्हा दाखल केला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात कर्मचारी, अधिकारी यांना मास्कशिवाय प्रवेश नाही

News Desk

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

बालमोहन शाळेची गुरुपौर्णिमा 

swarit