HW News Marathi
क्रीडा

कराटे चॅम्पियनशिपमध्ये चिमुकल्या भार्गवी संखेची उत्कृष्ट कामगिरी

नागनाथ बाबर –

पालघर – 24 ते 29 डिसेंबर 2016 रोजी इंदोर येथे पार पडलेली 62 वी “राष्ट्रीय स्कूल गेम कराटे चॅम्पियनशिप” स्पर्धा संप्पन झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा 42 जणांचा संघ सहभागी झाला होता आणि या स्पर्धेत महाराष्ट्राने 1 सुवर्ण , 4 रजत आणि 9 कास्य असे एकूण 14 पदक पटकाविली आहेत.

पालघर जिल्ह्यातील इयत्ता 7 वित शिकनारी कु. भार्गवी प्रशांत संखे हिची यावर्षी सुद्धा या संघात निवड झाली होती आणि मागील दोन वर्षाची पुनरवुत्ती करत यावर्षी सुद्धा म्हणजे सतत 3 वर्ष भार्गवीने आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे आणि सुवर्ण पदक पटकावून देणारी हि चिमुकली भार्गवी महाराष्टातून पहिली खेळाडू ठरली.असून आतापर्यंत भार्गवी जवळ जवळ महाराष्ट्रा ला सुवर्ण,रजत, कस्य असे ऐकून 170 पदके मिळवून देणारी प्रथम चिमुली खेळाडू ठरली आहे.

मिळविलेले यश पाहता या चिमुकली भार्गवीची भेट घेतली असता तिने सांगितले कि , वसई-विरारची नगरी हि क्रीडा नगरी असून त्याला आमचे लोकनेते मा हितेंद्र ठाकूर , सध्याचे महापौर प्रवीणा ठाकूर तसेच इथे असलेले क्रीडा पदाधिकारी यांचा खूप मोठा वाटा आहे.त्यांच्या कडून मिळणारे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तसेच माझ्या मागे असलेले माझे प्रशिक्षक सेंसॉई सीताराम चव्हाण ,सेंसॉई सूर्यप्रकाश मुंडापाठ यांची मेहनत त्याच बरोबर आईबाबांचा – थोरामोठ्यांचा आशीर्वाद हेच माझ्या यश मागचे मोठे कारण आहे. भार्गवीने मिळविलेल्या यशामुळे तिची संपूर्ण महाराष्ट्रात वाहवा होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk

शिक्षणासोबत खेळालाही महत्व द्या- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

News Desk

Birthday Special : ‘टायगर’ पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात तरुण कर्णधार

News Desk