HW News Marathi
देश / विदेश

कुत्र्याऐवजी महिलेलाच काढले विमानाबाहेर

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या साउथवेस्ट एअरलाइन्समध्ये एक वेगळाच प्रकार घडलाय. विमानातून प्रवास करताना कुत्र्यांना विमानातून उतरवण्याची विनंती करणा-या एका महिलेलाच विमानातून उतरवण्यात आल्याची घटना घडली आहे. वॉशिंग्टन जवळच्या बाल्टीमोर विमानतळावर ही घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्राध्यापक असलेल्या 46 वर्षीय अनिला दौलात्झाई यांच्यासोबत ही घटना घडली आहे. लॉस एंजेलिसला जाण्यासाठी बाल्टीमोर विमानतळावरून साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानात त्या बसल्या. पण विमानात बसल्यावर त्यात दोन कुत्रे असल्याचं लक्षात येताच अनिला दौलात्झाई प्रचंड घाबरल्या. कुत्र्यांना पाहिलं तरी हृदयाचा ठोका चुकतो इतक्या त्या कुत्र्याला घाबरतात. त्यामुळे कुत्र्यांना विमानातून उतरवावं नाहीतर माझा जीव जाईल अशी विनंती त्यांनी विमानातील क्रू मेंबर्सना केली. पण कुत्र्यांना विमानातून उतरवू शकत नाही असं म्हणत विमानातील क्रू मेंबर्सनी अनिला दौलात्झाई यांनाच विमानातून उतरण्यास सांगितलं. विमानातून उतरण्यास अनिला यांनी नकार दिला असता सुरक्षारक्षकांना आणि पुरूष पोलिसांना बोलावण्यात आलं. अनिला यांनी त्यांनाही विरोध केला असता त्यांनी अनिला यांना बळजबरीने विमानातून उतरवण्यास सुरूवात केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार, नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया

News Desk

पुरग्रस्तांसाठी अडीच हजार कोटींची मदत जाहीर

News Desk

लोकसभेत तरी मोहन डेलकरांना न्याय मिळेल काय? – सामना

News Desk