HW News Marathi
देश / विदेश

फेसबुक ओळखणार तुमचे नैराश्य!

वॉशिंगटन – फेसबुक किंवा इंस्टाग्राम या सोशल मिडियावर फोटो शेअर केल्यानंतर लगेचच तुम्ही नैराश्यग्रस्त आहात का, हे कळू शकणार आहे. शास्त्रज्ञांनी असा कंम्प्यूटर प्रोग्राम विकसित केला आहे, जो डॉक्टरपेक्षाही जलद गतीने नैराश्याचे निदान करू शकतो. तसेच यात ७० टक्के अचूक निदान करण्याची क्षमता आहे.

अमेरिकेतील वर्मोंट विद्यापीठाच्या क्रिस्टोफर डेनफोर्थ यांनी सांगितले की, सोशल मिडियावर आम्ही निरीक्षण नोंदविले आहे, नैराश्यग्रस्त लोकांच्या फोटोचे रंग गहिरे असतात आणि त्याच्यावर कॅमेंटही खूप असतात. नैराश्यग्रस्त लोकांनी अन्य लोकांच्या तुलनेत अधिक पोस्टही केलेल्या आढळतात.

दरम्यान, संशोधकांनी सुप्रसिद्ध सोशल अपच्या १६६ वापरकर्त्यांच्या ४३ हजार ९५० छायाचित्रांचे विश्लेषण करण्यासाठी संगणकाच्या या प्रोग्रामचा वापर केला. त्यात ७१ लोकांना नंतर डॉक्टरकडे गेल्यावर खरंच नैराश्य आल्याचे निष्पन्न झाले. येथील एक संशोधक पत्रिका ईपीजे डाटा साइसमध्ये हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत समन्वयाची जबाबदारी सुनील केदार यांच्यावर सोपवली

swarit

डोक्याला चेंडू लागून पाकिस्तानी खेळाडूचा मृत्यू

News Desk

“लवकरच ठाकरे सरकार कोसळणार…”, अमित शहांचे मोठे विधान

News Desk