HW News Marathi
देश / विदेश

उत्तर कोरिया पुन्हा ‘धमाका’ करण्याच्या तयारी

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) उत्तर कोरिया लष्कराच्या विजयी दिनी जगाला धक्का देणारा धमाका करण्याची शक्यता आहे. कोरिया वारंवार क्षेपणास्त्र चाचणी घेऊन जगाला धक्का देत आलेला आङे. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार उत्तर कोरिया २७ जुलै रोजी आणखी एका क्षेपाणास्राची चाचणी घेण्याची शक्यता आहे.

27 जुलैला उत्तर कोरियात विजय दिवस साजरा केला जातो. या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त उत्तर कोरियात विजय दिवस साजरा केला जातो. गुरुवारी युद्धातील विजयास ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाच्या प्यॉंगयॉंग प्रांतात आयसीबीएम उपकरण घेऊन जाणारे वाहन दिसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गुरुवारी क्षेपणास्त्र चाचणी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 2014 मध्ये उत्तर कोरियाने 26 जुलै रोजी स्कड बी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन विजय दिवस साजरा केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आयसीबीएमची यशस्वी चाचणी केली होती. या चाचणीनंतर अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या अलास्का राज्यापर्यंत या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योग ही भारताने जगाला दिलेली भेट | मोदी

News Desk

“शेजारी पाहा काय घडतय”, मेहबूबा मुफ्ती यांचा पंतप्रधानांना इशारा

Jui Jadhav

राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी

News Desk