HW News Marathi
मुंबई

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरला अटक

मुंबई | सीएसएमटी स्टेशनजवळीत शुक्रवारी (१५ मार्च) हिमालय पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले होते. या दुर्घटने प्रकरणात आज (१८ मार्च) स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाई याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. देसाई विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पुलाची दुरूस्ती करणाऱ्या आरपीएस कंत्राटदाराला शनिवारी (१६ मार्च) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले होते. या नोटीसला उत्तर देण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. हिमालय पुलाची २०१३ मध्ये या पुलाची दुरूस्ती आरपीएस या कंत्राटदाराने केली होती. २०१७-१८ यादरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये पुल धोकादायक नससल्याचे सांगत किरकोळ दुरूस्तीची असल्याचे देसाई याने सांगितले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट संपाचा पाचवा दिवस, मुंबईकरांना एसटीची साथ

News Desk

मालवानीत इमारतीचे छत कोसळले, दोन जण जखमी

News Desk

राज ठाकरेंच्या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna