HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

मुंबई | “वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर करताना त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख करून प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या जातीवाद नष्ट करण्यासाठीच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?”, अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी (१७ मार्च) अहमदनगर येथे केली आहे. समाजातून जातीवाद पूर्णतः नष्ट करण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनीच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना कंसात प्रत्येक उमेदवाराच्या जातीचा उल्लेख केल्याने त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

“शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर त्यांच्या जातीचा उल्लेख केला जाऊ नये, अशी आग्रही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. मात्र, आता खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच आपल्या उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. मग आता प्रकाश आंबेडकर यांच्या जातीवाद नष्ट करण्यासाठीच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?” असा सवाल कवाडे यांनी विचारला आहे.

वंचित बहुजन आघाडीने देखील नुकतीच आपल्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे, प्रकाश आंबेडकर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या यादीतील सर्व उमेदवारांच्या नावांपुढे कंसात त्यांच्या समाजाचा उल्लेख करण्यात आला. यावरून, प्रकाश आंबेडकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्याचप्रमाणे अनेक प्रश्नांना देखील सामोरे जावे लागले. मात्र, “आम्ही आज जात जाहीर केली. आम्ही निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी दिली आहे. ही पद्धत कोणताही राजकीय पक्ष स्वीकारत नाही. या नव्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलेल”, अशी उलट प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना पुन्हा दिली उमेदवारी

News Desk

Breaking News : राफेल डीलची याचिका न्यायालयात रद्द, काँग्रेसला मोठा धक्का

News Desk

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

News Desk