HW News Marathi
देश / विदेश

‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविणार ?

नवी दिल्ली | काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा मास्टरमाईंड जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आज (१३ मार्च) आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठीचा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर येणार आहे. या ठरावावर आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर हा भारताचा मोठा विजय मानला जाणार आहे.

या हल्ल्यानंतर भारताने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करून करण्यासाठी आवाहन केले होते. भारताच्या मागणीला अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने दुजोरा देत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यात चीनने या प्रस्तावावर नकार दर्शविला होता. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यावर एकमत झाले नव्हते. जर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले तर त्याच्या दहशतवादी कारवाया रोखल्या जातील. तसेच त्याच्या परदेशी प्रवासावर आणि मालमत्तेवर जप्त करण्यात येईल.

अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यांचे समर्थन मिळाले आहे. भारताला या तिन्ही देशांसोबत रशियाचे ही याला समर्थन करण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरक्षा परिषद १२६७ धोरणांतर्गत एखाद्या संस्था, संघटनेला दहशतवादी घोषित केल्यानंतर चीनने या प्रस्तावाला समर्थन दिले आणि तीन वाजेपर्यंत त्यावर आक्षेप घेतला नाही. तर दुपारी तीन वाजल्यानंतर अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तिवारी यांचे निधन

News Desk

हिमाचल प्रदेशमध्ये कडा कोसळली! 30 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले

News Desk

देशातील सर्वात जास्त लांबीच्या पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उदघाटन

News Desk