HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य एक दिवस आधीच मुंबईत दाखल, ‘मातोश्री’ बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी पोलिसांना हुलकावणी देत एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य उद्या (२२ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

अमरावतीत पोलिसांनी राणा दाम्पत्यांना रोखण्याआधीच ते मुंबईत दाखल झाले आहेत. रणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक आहेत. मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊसवर राणा दाम्पत्यांना शोधासाठी पोलीस दाखल झाले असून नंदगिरी गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहाल तर शिवसैनिक सोडणार नाही. राणा दाम्पत्य मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री!

News Desk

ही तर कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा ! – जयंत पाटील

swarit

अजित पवारांचे निकटवर्तीय रविराज तावरेंवर गोळी झाडणारे सापडले, बारामतीत अल्पवयीन तरुणासह ४ जणांना अटक

News Desk