HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून हाफीज सईदवर धार्मिक उपदेश करण्यास बंदी

नवी दिल्ली | पाकिस्तानकडून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि ‘लश्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदवर धार्मिक उपदेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हाफिज सईद हा दर शुक्रवारी नमाज पठणानंतर लाहोरमधील जमात-उद-दावा मुख्यालयात धार्मिक उपदेश देण्यास जातो. मात्र, पाकिस्तानामधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी कादसियाच्या जामिया मशीद परिसरात सईदला प्रवेशास त्याचप्रमाणे धार्मिक उपदेश करण्यास मनाई केली आहे. तसेच जमात-उद-दावाचे मुख्यालय देखील सील करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आला. पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जगभरातून होत आहे. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून १८२ मदरशांवर नियंत्रण ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. “आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असून पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरूद्ध कारवाई करत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे”, अशी माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती.

पाकिस्तान सरकारने ५ मार्चला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या २ भावांसह एकूण ४४ दहशतवाद्यांना अटक केली होती. “आम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊन ही कारवाई केलेली नाही. आम्ही यापूर्वीच दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईची योजना आखली होती”, असेही यावेळी पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणाला रामराम!

News Desk

टायगर अभी जिंदा है’, वर ज्योतिरादित्य यांना दिग्विजय सिंह यांचे प्रत्युत्तर

News Desk

मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

News Desk