HW News Marathi
राजकारण

भारतात धर्मविरोधी वक्तव्यांवर कारवाई का होत नाही ?

गौरी टिळेकर | “आम्ही मुस्लिम आहोत. आमच्याकडे आमचा मौला अली यांच्या शौर्याचा ध्वज आहे. तुम्हा हिंदूंकडे मात्र असा ध्वज नाही. तुम्ही आमच्यापेक्षा सातपट जास्त चांगले आहात, या भ्रमात राहू नका. मूर्तीपूजा करणाऱ्यांनो जे आमच्याकडे आहे, ते तुमच्याकडे नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे सांस्कृतिक मंत्री फय्याजुल हसन चौहान यांनी पत्रकार परिषदेत केले होते. या वादग्रस्त विधानामुळे चौहान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. “हिंदू समाज गाईचे मूत्र पितो”, असे म्हणत चौहान यांनी हिंदू धर्मियांना हिणवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चौहान यांना त्यांची ही वक्तव्ये चांगलीच भारी पडली आहेत.

पाकिस्तानची जनता आणि पाकिस्तानच्या नेत्यांकडून चौहान यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. इतकेच नव्हे तर ट्विटरवर #SackFayazChohan हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत होता. फय्याजुल चौहान यांच्या हिंदूविरोधी टीकेची गंभीर दाखल घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फय्याजुल चौहान यांना ताबडतोब पदावरून हटविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे चौहान यांनी राजीनामा सादर केल्यानंतर तो तातडीने स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

“माझे विधान पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांबद्दल नव्हते, तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात होते. माझ्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधील हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो”, असे म्हणत चौहान यांनी माफी देखील मागितली. मात्र, तरीही पंतप्रधानांनी त्यांना पदावरून हटविले.

आपल्या भारतात देखील अनेकदा अशी धर्मविरोधी आणि वादग्रस्त वक्तव्ये सर्रास करण्यात आली आहेत. आजही केली जातात. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र, आपल्या देशात धर्मावरून केल्या जाणाऱ्या राजकारणाचे प्रमाण प्रचंड आहे. आपण कोणत्याही व्यक्तीला बोलण्यापासून रोखू शकत नसलो तरीही त्यांच्या वादग्रस्त विधानांनंतर कारवाई नक्कीच केली जाऊ शकते. जर आपण एका धर्मनिरपेक्ष देशात राहतो तर आपल्याला त्या सर्व धर्मांबद्दल किमान आदर असणे आवश्यक ठरते. मात्र, आपल्याच देशातील काही जबाबदार मंडळींची, बेजबाबदार आणि वादग्रस्त विधाने पहिलीत तर तुम्हाला देशातील एकूण स्थितीचा अंदाज येईल. विशेष म्हणजे या मंडळींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

ही आहेत देशातील काही नेत्यांची धर्मविरोधी वक्तव्ये

  • फेब्रुवारी २०१८ मध्ये भाजप खासदार विनय कटियार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना असे म्हटले होते कि, “मुसलमानांनी भारतात राहू नये. त्यांनी त्यांच्या समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर देश विभागला. मुसलमानांनी बांगलादेश किंवा पाकिस्तानला जावे. त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही.”
  • “केवळ ब्राह्मणांनाच हिंदू धर्माबाबत बोलण्या इतके ज्ञान आहे”, असे वक्तव्य काँग्रेस नेते सी.पी.जोशी यांनी केले होते.
  • उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग म्हणाले, “श्रीराम जरी आले तरीही बलात्काराच्या घटनांवर नियंत्रण आणले जाऊ शकत नाही.”
  • “मी राजकारणात प्रवेश केल्यानंतर मथुरेमध्ये प्रथम असे विधान केले होते कि, अयोध्या, मथुरा आणि काशीहून निघा आणि दिल्लीतील जामा मस्जिद उध्वस्त करा. जर आपणास येथे हिंदू मूर्तींचे अवशेष सापडले नाहीत तर मला फासावर द्या. मी तयार आहे”, त्याचबरोबर प्रत्येक हिंदू महिलेले किमान ४ मुले जन्माला घालायला हवी. तरच, हिंदू धर्म टिकून राहील”, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केले होते”.
  • “हिंदूंना ख्रिश्च धर्मात रूपांतरित करण्याच्या उद्देशात मदर तेरेसा देखील सामील होत्या. हिंदूंची सेवा करण्याच्या नावावर त्यांनी भारतातील हिंदूंना ख्रिश्चन धर्मात रूपांतर करण्यास सांगितले. उत्तर पूर्व भारतात मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्याने अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये फुटीरवाद्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. या भागात हिंदूंची परिस्थिती बिकट आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
  • “पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात ४५० दंगली झाल्या. याचे कारण म्हणजे एका विशिष्ट समुदायाच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. पूर्वी उत्तर प्रदेशात दंगली का होत नव्हत्या ? हे आपण सहजपणे समजून घेऊ शकता. अल्पसंख्यांकांची लोकसंख्या १० ते २० % असलेल्या ठिकाणी अशा धार्मिक दंगली घडतात. २० ते ३५% लोकसंख्या असलेल्या ठिकाणी धार्मिक दंगलींचे प्रमाण गंभीर आहे. तर ३५ % पेक्षा जास्त अल्पसंख्यांक लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी मुस्लिमांशिवाय इतर समाजातील लोकांना जागाच नसते”, असे वादग्रस्त वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही ‘त्यांच्या’ सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातले !

News Desk

Raj Thackeray ED Live Updates : साडेआठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर

News Desk

“मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna