HW News Marathi
देश / विदेश

मला तुमच्याकडून देशभक्तीचे धडे घेण्याची गरज नाही, पत्रकाराने गोयल यांना सुनावले

नवी दिल्ली | “मी किंवा येथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही तुमच्याकडून किंवा इतर कोणाकडून राष्ट्रवादाचे किंवा देशभक्तीचे धडे घेण्याची गरज नाही”, असे इंडिया टुडेचे पत्रकार राहुल कंवल यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना सुनावले आहे. गोयल हे शुक्रवारी (१ मार्च) इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये सहभागी झाले होते. “आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांच्या म्हणण्यानुसार, भारतीय वायुसेनेकडून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट आणि मुज्जफराबाद येथे एअर स्ट्राईकदरम्यान करण्यात आलेली बॉम्ब फेक ही जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर झाली नसून तिथल्या जंगलात झाली. याबाबत तुम्ही काय सांगाल ?, असा प्रश्न पत्रकार राहुल यांनी गोयल यांना या कार्यक्रमादरम्यान विचारला होता.”

पत्रकार राहुल यांच्या प्रश्नावर गोयल चिडून असे म्हणाले की, “तुम्ही अत्यंत वाईट प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न विचारून तुम्ही भारतीय सैन्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहात का?, तुम्हाला आपल्या सैन्याच्या क्षमतेवर विश्वास नाही का ?, आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या म्हणण्यावर तुम्ही देखील सहमत आहात का ?, पाकिस्तानचे प्रचारतंत्र तुम्ही देखील वापरत आहात का ? तुम्हा लाज वाटली पाहिजे,” असे आरोप गोयल यांनी पत्रकार राहुल यांच्यावर केले. त्यानंतर उत्तर देताना पत्रकार राहुल म्हणाले की, “मी किंवा येथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही तुमच्याकडून किंवा इतर कोणाकडून राष्ट्रवादाचे किंवा देशभक्तीचे धडे घेण्याची गरज नाही.”

काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी (१४ फेब्रुवारी) सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट आणि मुज्जफराबाद येथे एअर स्ट्राईक करण्यात आला होता. भारतीय वायुसेनेने केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले. या हल्ल्यात जवळपास २५० पेक्षा जास्त दहशतवादी खात्मा झाल्याचे सांगिण्यात येत आहे. परंतु अशा प्रकराची कोणतीही अधिकृत माहिती भारत सरकारकडून देण्यात आली नाही. भारतीय सेनेच्या या कारवाईवर विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, लवकरच कळेल मध्यस्ती होणार की नाही?

Atul Chavan

अयोध्या प्रकरणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk