नवी दिल्ली | “आपल्याकडे या हवाई हल्ल्याच्या वेळी जर राफेल असते तर आपले एकही विमान कोसळले नसते आणि पाकिस्तानचे एकही विमान वाचले नसते”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी (३ मार्च) देखील अशाच प्रकारचे एक विधान केले होते. “राफेल करारावर झालेल्या स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आज देशाला राफेलची कमतरता जाणवते आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
PM Modi in Jamnagar, Gujarat: The nation agrees that the menace of terror has to be eliminated. I want to ask you, don't you trust what our armed forces say? We should be proud of our armed forces. pic.twitter.com/zx71igb81d
— ANI (@ANI) March 4, 2019
“दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारतीय सैन्य आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे. मात्र काहींना सैन्याच्या कारवाईवर विश्वास नाही. ते सैन्याच्या कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत”, असा टोला देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. “विरोधक भारतीय सैन्याचे खच्चीकरण का करत आहेत ? ज्या विधानांमुळे शत्रूला फायदा होईल अशी विधाने विरोधकांकडून का केली जात आहेत ?” असा सवालही याआधी पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता.
पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या भीषण दहशवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. परंतु, आता विरोधकांकडून याबाबतचे पुरावे, तसेच या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवाद्यांच्या खात्मा झाला याबाबत विचारणा होत आहे. यामुळे भाजपसह पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.