HW News Marathi
राजकारण

धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती मिळणार | मुख्यमंत्री

मुंबई | धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. परंतु धनगर समाजाला या सवलती आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत लागू असतील असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज (२ मार्च) कॅबिनेटची सब कमिटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

या बैठकीत शासनाची घरकूल योजना धनगरांना लागू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात १० हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत अर्थसंकल्पामध्ये देखीलही तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच वसतीगृह आणि शाळांमध्ये गरीब धनगर समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरक्षणासाठी धनगर समाजाने केलेल्या आंदोलनात सामील झालेल्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले. ते गुन्हे लवकरच मागे घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. न्यायालयामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच धनगर समाजासाठी स्वयम ही योजना लॉन्ज करण्यात आली असल्याची माहिती देखील यावेळी दिली गेली. या योजनेमुळे धनगर समाजातील मुलांना शिष्यवृत्तीचा फायदा होईल. तसेच सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फोन पण लाव आणि कॅमेरा पण लाव असे सांगत नाही,” अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna

भाजपचे नाराज खासदार उदित राज यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?

News Desk