HW News Marathi
देश / विदेश

संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची घेतली भेट

नवी दिल्ली | भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (२ मार्च) भेट घेतली आहे. सीतारामन यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. निर्मला सीतारामन भेटण्यापूर्वी अभिनंदन यांनी वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांच्या भेट घेऊन चर्चा केली आहे. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अभिनंदन यांनी धनोआ यांना पाकिस्तानमध्ये दोन दिवस असतानाचा घटनाक्रमाची माहिती दिली.

विंग कमांडर अभिनंदन वायुसेने अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये राहणार आहेत. अभिनंदन शुक्रवारी (१ मार्च) रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी वाघा- तारी बॉर्डरवरून मायदेशात परतले होते. तेथून त्यांना अमृतसरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्लीला सेनेच्या बेस रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. भारतात परतल्यानंतर अभिनंदन यांनी सर्वप्रथम पालम विमानतळावर आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आई, वडिल, पत्नी आणि मुलाची गळाभेट घेतली.

भारतीय वायुसेनेच्या विमानांनी मंगळवारी(२६ फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. पाकिस्तामध्ये त्यांचे विमान पाडण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तान लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, पवारांनी केले ‘आप’चे अभिनंदन

swarit

कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण  

News Desk

पंतप्रधान दिल्लीश्वर कोकणातील वादळग्रस्तांसाठी २ हजार कोटी देतील अशी आशा!

News Desk