HW News Marathi
देश / विदेश

लोकसभा निवडणूक वेळेवरच, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

नवी दिल्ली | पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेत एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यानतंर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी सांगितले आहे.

गेल्‍या आठवड्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक तयारीवर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक आयुक्त अशोक लवासा म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला असल्‍याची माहिती दिली होती.

तसेच सर्व पक्षांसोबत बैठक घेण्यात आली असल्‍याचेही सांगितले होती. त्‍यामुळे लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक बदलणार अशी शक्‍यता वर्तविण्यात आली होती. परंतु, आता निवडणूक आयोगाने दिलेल्‍या स्‍पष्‍टीकरणामुळे या सर्व शक्‍यतांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्कराची नोकरी सोडण्यासाठी चंदू चव्हाणांचे वरिष्ठांना पत्र

News Desk

आता हेलिकॉप्टरमधून घ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्याचा आनंद

News Desk

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद

News Desk