HW News Marathi
देश / विदेश

भारताकडून मिसाईल हल्ला होईल याची आम्हाला भीती होती !

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव आणखीच वाढले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत पाकिस्तानच्या संसदेत भाष्य केले. “पाकिस्तानच्या कारवाईनंतर भारताकडून मिसाईल हल्ला होईल याची आम्हाला भीती होती. म्हणूनच आम्ही संपूर्ण देशाला हाय अलर्ट दिला होता”, असे इम्रान खान यांनी म्हटले.

“ज्या पद्धतीने भारताने आमच्या सीमा पार केल्या त्याचप्रमाणे आम्ही देखील भारतीय सीमा पार केल्या. भारताची २ विमाने देखील आम्ही पाडली. परंतु, आम्हाला शांतता हवी आहे. परंतु, आम्हाला केवळ हे लक्षात आणून द्यायचे आहे कि आम्हीही हल्ला करू शकतो”, असे इम्रान खान यावेळी म्हणाले. पाकिस्तानकडून कितीही दावे होत असले तरीही आतंरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कठोर कारवाईपुढेच पाकिस्तान झुकला असल्याचे म्हटले जात आहे.

“आम्हाला केवळ शांतता हवी आहे. म्हणूनच मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु, आमच्या या प्रयत्नाला आमची कमजोरी समजू नये”, असेही इम्रान खान यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांची आज (१ मार्च) पाकिस्तानकडून मुक्तता होणार असून ते लवकरच मायदेशी परतणार आहेत. कमांडर अभिनंदन हे वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतणार असून संपूर्ण भारत याकडे डोळे लावून बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

…आणि जेव्हा पंतप्रधान मोदी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करतात

News Desk

काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल-आऊट’सारखा कोणताही प्रकार नाही !

News Desk