HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : देशातील बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसारख्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी भोंगांवरून राजकारण!

मुंबई | “युवकांना देशातील बेरोजगारी, अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था यासारख्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी मशिदी, भोंगे आणि हुनमान चालीसा यासारख्या विषयांवर लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत,” असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे. देश आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!. तब्बल दोन वर्षानंतर सर्वसामान्य जनतेला पुन्हा पूर्वीसारख्या उत्साहाने आंबेडकर जयंती साजरा करायला मिळत आहे, असेही आंबेडकर एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे हटवा, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारल्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “लोकांना मुळ मुद्द्यांपासून भरकटवत आहेत. आज शिक्षण व्यवस्था हा सर्वात मोठा प्रश्न होताना दिसत आहे. आपल्याकडे एम. बी. बी. एस.ला पुरेशा जागा नसल्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या देशात म्हणजे युक्रेनला जातात. ते तेथे अडकलेले दिसून आले. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था कोलमडलेली दिसते. कोरोना काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून बहुताश तरुण हे बेरोजगार आहेत, यासारख्या गंभीर विषयांवर कोणीही बोलताना दिसत नाही. सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांना या विषयांवर बोलायचे नाही. म्हणून मशिदी, भोंगे, हुनमान चालीसा यासारख्या विषयावरून मुलांना गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंरतु, आजचा युवक हा जागृक आहे. त्यामुळे तो प्रश्न विचारायला तर त्यांच्याकडे उत्तर नाही.”

भोंगवर तुम्ही तुमची उघडपणे भूमिका मांडल्यामुळे दुसऱ्यांवर टीका करण्याचे तुमच्या वय नाही, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. यात तुमची जात, धर्म आणि भाषा बघत नाहीत. माझे वय नसले तरी मी एका राजकीय मंचावरून भूमिका मांडली असून त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे ते माझ्या वयावर बोलत आहेत. उत्तर असेल तर मुद्द्यावर बोला, असे सुजात आंबेडकर म्हणाले. तुम्ही राजकीय नेत्यांवर बोलत आहात म्हणजे ही तुमची राजकारणात एंट्री असे बोलयाचे का?, ते म्हणाले, माझी राजकारणात एंट्री खूप आधीच झाली. पण ती नेता म्हणून आज आणि उद्या पण नाही होणार. मी आधी विद्यार्थी आंदोलनकांमध्ये काम करत होतो. मी विद्यार्थी कार्यकर्ता, आता विद्यार्थी नाही राहिलो तर फक्त कार्यकर्ता म्हणून काम करतोय, असे सुजात आंबेडकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल

News Desk

संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

News Desk

महाराष्ट्रात हे चालले तरी काय?…. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल!

News Desk