HW News Marathi
महाराष्ट्र

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

मुंबई | भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भाजपेचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अभिवादन केले. “प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजविज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल,” असे पडळकर म्हणाले. 

पडळकर म्हणाले, “आजचा दिवस या देशातील दुर्बल वंचिताना प्रेरणा देणारा आहे. कारण परमपुज्य विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजविज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. जेंव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात. आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात. वंचित समूहावर अँट्रोसिटीच्या घटनाही वाढयला लागतात. आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते. पण तरिही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुकानातील चोरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडणार हे केवळ स्वप्नरंजन

News Desk

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात – मुख्यमंत्री

News Desk