चुरु | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करून मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांच्या शौर्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केला आहे. ‘सौंगध मुझे इस मिट्टी की मैं देश नही मिटने दूंगा’ या कवितेने मोदींनी राजस्थानमधील चुरुमध्ये आज (२६ फेब्रुवारी) झालेल्या जाहीर सभेत भाषणाला सुरुवात केली. मोदींनी भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे.
PM Narendra Modi in Churu, Rajasthan: Today I repeat what I said back in 2014 – Saugandh mujhe is mitti ki main desh nahi mitne doonga, main desh nahi rukne doonga. Main desh nahi jhukne doonga….Mera vachan hai Bharat maa ko, tera sheesh nahi jhukne doonga… pic.twitter.com/lChHOJm94Z
— ANI (@ANI) February 26, 2019
तसेच देश सुरक्षित हातांमध्ये आहे. या जाहीर सभेत आज पुन्हा एकदा देशाला हा प्रधानसेवक नमन करत आहे, असे मोदी म्हणाले. राजस्थानच्या काँग्रेस सरकारने शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची यादी पाठविली नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आता शेतकरी बँकेत जाऊन पैसे काढू शकतात, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
PM Narendra Modi in Churu,Rajasthan: Today I assure the countrymen, the country is in safe hands. pic.twitter.com/UDl5z4e91G
— ANI (@ANI) February 26, 2019
दहशतवाद्यांच्या या कारवाईत भारतीय वायू सेनेच्या ‘मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळापास २०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची, सर्जिकल स्ट्राइक-२ करण्याची तीव्र भावना देशभरातून व्यक्त होत होती. जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारताने आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.