मुंबई | पुलवामा हल्लानंतर भारताकडून करण्यात आलेली एक अतिशय महत्वाची कारवाई म्हणजे आज (२६ फेब्रुवारी) केलेले Air Strike. अवघ्या १२ दिवसांत भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जवळपास १००० किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यात अनेक दहशवाद्यांचा खात्मा झाल्याची अधिकृत माहीती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सकाळी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन प्रचंड कौतुक होत आहे. मुख्यमंत्र्यांनी भारतीय लष्कराच कौतूक केले आहे. तर विविध राजकीय नेत्यांकडून ट्विट करुन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
🇮🇳 I salute the pilots of the IAF. 🇮🇳
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2019
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी भारतीय वायूदलाचे अभिनंदन केल आहे. मी भारतीय वैमानिकांना सलाम करतो असे ट्विट त्यांनी केले आहे.
Salute to #indianairforce for giving befitting reply to the terrorists operating from POK !#IndiaStrikesBack
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 26, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेस पाक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत भारतीय वायू दलाला मी सलाम करतो अस ट्विट केले आहे. पाकिस्तान आणि दहशतवादाला हे चोख प्रत्युत्तर असल्याच त्यांनी म्हटले आहे.
Salute to our Brave Fighter Pilots of #IndianAirForce
Jai Hind!🇮🇳— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 26, 2019
महा्राष्ट्र कॉग्रेस कमीटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटरवरुन भारतीय वायूदलाला सलाम करतो असे म्हणत वैमानिकांचे कौतुक केले आहे.
अतुलनीय शौर्य दाखवून अतिरेकी तळांवर केलेल्या कारवाईसाठी #IndianAirForce ला सलाम!
पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, ही तमाम भारतीयांची भावना असून, वायूदलाच्या कारवाईत याच अपेक्षेचे प्रतिबिंब उमटले आहे. भारतीय वायूदलाचा आम्हाला अभिमान आहे.#जयहिंद #IndiaStrikesBack— R Vikhe Patil (@RVikhePatil) February 26, 2019
विरोधी पक्षनेता आणि कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना सलाम केला आहे. पुलवामा हल्ल्याचे हे चोख प्रत्युत्तर असल्याच म्हणत भारतीय वायूदलाचा अभिमान असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
I salute the bravery of Indian Air Force pilots who have made us proud by striking terror targets in Pakistan.
जय हिंद!
वंदे मातरम— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी दहशतवाद आणि पाकीस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. असं म्हणत ट्विट केलं आहे. मी भारतीय वायूदलाला सलाम करतो असही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.