HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामधील हल्ल्यात वापरलेल्या कार मालकाचा शोध लागला

श्रीनगर | जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवाना शहीद झाले. या क्रुर आणि भीषण हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेल्या कारचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) छडा लावण्यात यश आले आहे. या गाडीचे मालकाचे नाव सज्जाद भट असे आहे. सज्जादनेच पुलवामा हल्ला होण्यापूर्वी अवघ्या १० दिवसांपूर्वी त्या गाडीची खरेदी केलीतची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेली कार मारुती इक्को कंपनी आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दारनेच तीच गाडी वापरली होती.

या गाडीचा मालक सज्जात हा सध्या फरार असून काश्मीर खोऱ्यातील एनआयएकडून शोध मोहिम हाती घेतली आहे. सज्जात हा जैश-ए-मोहम्मदच्या कळपात सामील झाल्याचे एनआयएच्या चौकशीतून समोर आले आहे. सज्जाद सिराज-अल- उलुमचा विद्यार्थी आहे. एनआयए पथकाने शनिवारी (२३ फेब्रुवारी) जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर धाड टाकली होती. सज्जाद फरार होऊन जैशमध्ये भरती झाल्याचे समोर आले आहे. सज्जाद शस्त्र हातात घेतल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत, असे एनआयएने म्हटले आहे.

एनआयएने केलेल्या चौकशीमध्ये मारूती गाडीचा चेसी क्रमांक MA3ERLF1SOO183735 आणि इंजिन नंबर G12BN164140 हा आहे. २०११ मध्ये मारुती कंपनीची ही गाडी अनंतनाग जिल्ह्यातील हेवन कॉलनीमधील मोहम्मद जलील अहमदला अहमद हकानी विकण्यात आली होती. त्या गाडीची आतापर्यंत सात वेळा खरेदी विक्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk

ठरलं ! बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार १५० जागा

News Desk

भगवंत मान हे ‘आप’कडून पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार

Aprna