HW News Marathi
मनोरंजन

भारतीय निर्मितीच्या ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ लघुपटाला ऑस्कर

लॉस एंजेलिस | जगभरातील सिनेसृष्टीसाठी मानाचा मानला जाणारा ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा आज (२५ फेब्रुवारी) पार पडला. भारतातील दिल्लीजवळील हापुडा जिल्ह्यातील एका गावातील सॅनिटरी नॅपकीन बनवणाऱ्या काही महिलांची कथा ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ या लघुपटाने ‘डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’ या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ लघुटपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकविला आहे. रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.

‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ या २६ मिनिटांच्या असून पॅड उपलब्ध नसणे ही महिलांसाठी एक गंभीर समस्या आहे. पॅडअभावी मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना आजारांशी सामना करावा लागतो. त्यात त्यांचा मृत्यूही ओढवतो. हा सिनेमा ‘पॅडमॅन’ अरुणाचलम मुरुगनाथन यांच्‍या कार्यावर प्रकाश टाकणार आहे. स्‍नेह नावाची तरुणी आपल्‍या मैत्रींणीसोबत सॅनेटरी पॅड बनवण्‍याचे उद्‍योग करते. त्‍याचबरोबर, त्‍याच गावात असणार्‍या एक पॅड मशीन आणि त्‍या महिलांचे अनुभव सांगणार हा लघुपट आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर गुनीत गोंगा यांनी त्यांच्या ट्विटरवरून आनंद व्यक्त केला आहे. गुनीत मोंगा यांनी ‘लंच बॉक्स’, ‘मसान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ब्लॅक शीप, एंड गेम, लाइफबोट आणि अ नाईट अ‍ॅट दी गार्डन या लघुपटांना मात देत ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ने बाजी मारली.

असा झाला ऑस्कर पुरस्कार सोहळा

  • सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट : रोमा
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री : रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता : माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट : स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स
  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट : पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट : फर्स्ट मॅन
  • सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म : स्किन
  • सर्वोत्कृष्ट वेशभुषा : रुथ कार्टर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र जोशींनी घेतला सचिन कुंडलकरांचा खरपूस समाचार

News Desk

आयपीएल सट्टा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अरबाजची चौकशी

News Desk

बीग बीसोबत नागराजचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

News Desk