HW News Marathi
राजकारण

आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई |आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे. दुष्काळ आणि आरक्षण विविध मुद्द्यांवरुन अधिवेशन तापण्याची चिन्हं आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या एक आठवड्याच्या अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयोग करण्याची शक्यता असून राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणांची पुनरावृत्ती केली जाईल, अशी शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार घातला आहे. चहापान हे काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं व्यासपीठ असतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकप मांडला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती निवडणूक २०२२ : मतपेटी सीलबंद करुन वाहनाद्वारे मुंबई विमानतळाकडे रवाना

Aprna

युद्ध नसताना जवान का शहीद होतात !

News Desk

दै. सामनाच्या पहिल्या पानावर मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात; भाजपच्या नेत्याचा टोला

Aprna