HW News Marathi
देश / विदेश

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासेना कार्यकर्त्यांची हकालपट्टी

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या संतापातून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ३ ते ४ काश्मिरी विद्यार्थ्यांना ‘काश्मीरला परत जा” असे म्हणत जबर मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर आता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या सर्व कार्यकर्त्यांची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

युवा सेनेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांनी या काश्मिरी तरुणांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांची युवा सेनेतून हकालपट्टी केली. या प्रकरणी पोलिसांनी अजिंक्य मोतके याच्यासह आणखी ४ जणांना अटक केली होती. यापैकी ३ जणांना यवतमाळच्या कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अजिंक्य मोतकेला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास आदित्य ठाकरेंचा विरोध

News Desk

ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळली

Aprna

NSE माजी CEO चित्रा रामकृष्ण यांच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी

Aprna