HW News Marathi
महाराष्ट्र

अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

न्यूयॉर्क । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित न राहता जगभर साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्त जगभरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. राज्यासह जगभरातील मराठीजणांकडून आज(१९ फेब्रुवारी) शिवजयंती साजरी करण्यात येत आहेत.
रयतेचा ‘जाणता राजा’ला अभिवादन करण्यासाठी न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात तेथील सर्व भारतीय जमून शिवाजी महराजांचा जन्मोत्स साजरा केला आहे. या कार्यक्रमाला खास करून सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, डेप्युटी काऊन्सूल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सिनेटचे सदस्य केविन थॉमस यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. अमेरिकेतील हजारोच्या संख्येने भारतीय या कार्यक्रमासाठी जमले होते.
सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फेसबुकवरुन एक फोटो अपलोड केला आहे. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर चक्क शिवाजी महाराजांच्या वेशातील तरुणासोबत नागराज यांनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच, “असा योग कधी तरीच येतो, असे कॅप्शनही नागराजने लिहिले असून थेट अमेरिकेतून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे.”
‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. नागराज मंजुळे यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना संबोधित केले. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील हॉलमध्ये शेकडो उपस्थित शिवप्रेमींनी महाराजांना मान वंदना दिल्या.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिडेंच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडून निषेध

News Desk

गुरुपौर्णमेनिमित्त पंकजा मुंडे यांनी त्यांच्या गुरूंचे केले स्मरण

News Desk

मेट्रो कारशेडला विरोध: प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ला अटक करून घेतली

News Desk