HW News Marathi
देश / विदेश

आता दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ?

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आता गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह येथील अन्य काही ठिकाणांवर आता दहशतवाद्यांचे लक्ष आहे. एका ई-मेलमार्फत ही माहिती मिळत आहे. सध्या या ई-मेलची सत्यता पडताळली जात आहे. तरीही या ईमेलची गंभीर दखल घेण्यात आली असून अहमदाबाद क्राईम ब्रँच एटीएसला याबाबत तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या ईमेलमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील तीर्थस्थाने आणि रेल्वे स्टेशन्सवर हल्ला करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईमेलनंतर नर्मदेच्या तीरावर असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळल्याने आग, गोवा विमानतळ दोन तासांसाठी बंद

News Desk

‘आधार’ वैध की अवैध?

swarit

विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा!

News Desk