HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : आमच्या शूर जवानांवरील भ्याड हल्ल्याचा सरकार तीव्र निषेध करते !

नवी दिल्ली | भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा भागात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. भारताने कायमच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला खडसावले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठीशी घालणे थांबवावे, असा स्पष्ट इशारा दिला आहे. “भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाय करण्यास भारत सरकार कटिबद्ध आहे. याचसोबत आम्ही दहशतवादाविरोधी लढा सुरू ठेवणार आहोत”, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताचे निवेदन

“आमच्या शूर जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सरकार तीव्र शब्दांत निषेध करते. हा हल्ला पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने केला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटाने हा हल्ला केला. अझरला त्याचे अतिरेकी कारवायांचे जाळे मजबूत करण्यासाठी आणि भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिलेआहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाय करण्यास भारत सरकार कटिबद्ध आहे. याचसोबत आम्ही दहशतवादाविरोधातला लढाही सुरू ठेवणार आहोत”, असे निवेदन पुलवामा हल्ल्यानंतर केंद्राकडून जारी करण्यात आले आहे.

“आम्ही पाकिस्तान सांगू इच्छितो कि त्यांनी दहशतवादी आणि अतिरेकी गटांना मदत करणे थांबवावे. त्यांच्या प्रदेशातून दहशतवाद्यांना मिळणारी रसद थांबवावी, इतर देशांमध्ये हल्ले करण्यासाठी त्यांना मिळणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा नष्ट करावा. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना असे आवाहन करतो की जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे”, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानसोबतच्या संबंधांमुळे चीनने कायमच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरवर बंदी आणण्यास विरोध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीला २ वर्ष मुदतवाढ द्यावी, केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

News Desk

द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना,डोक्यावर ठेवले चप्पल

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन ! पंकजा मुंडे आक्रमक

News Desk