मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (१४ फेब्रुवारी) मुंबई राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा या मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. तर अजित पवारांचे चिरजीव पार्थ पवार हे मावळ मतदार संघ आणि सुप्रिया सुळे या बारामतीतून लोकसभा निडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे.
#Mumbai: NCP Chief Sharad Pawar holds party meeting to discuss seat sharing for Lok Sabha elections. pic.twitter.com/X6EHNU1VgC
— ANI (@ANI) February 14, 2019
शरद पवार यांनी माढातून निवडणूक लढवावी, शक्रवारी ( ८ फेब्रुवारी) पार पडलेल्या बैठकीत अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. या बैठकीत देखील शरद पवारांनी अजित पवार हे निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळाली होते. आज राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याची माहितीवर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारला उमेदवारी देऊन पवार कुटुंबियांची पुढची पिढी निवडणुकीच्या मैदानात उत्तर आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.