HW News Marathi
महाराष्ट्र

अॅड गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | अॅड गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. सदावर्तेंना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्तेंसह सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना जामिनासाठी अर्ज करु शकतात. तसेच सातारा पोलिसांकडून सदावर्तेंचा ताब्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने सतावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे ताबा देण्यास हरकत नाही, असे म्हटले आहे. सदावर्तेंना आर्थर रोड जेलमध्ये नेण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्या आहेत. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna

चौकशीत बाधा येऊ नये म्हणून आयुक्तांची बदली केली – गृहमंत्री

News Desk

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २४ तासांत होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कुणाची लागणार वर्णी?

Ruchita Chowdhary