HW News Marathi
देश / विदेश

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई | तुम्हाला तुमच्या आवडत्या टीव्ही वाहिन्या निवडता याव्यात यासाठी ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया’कडून (ट्राय) आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ट्रायकडून देण्यात आलेली मुदतवाढ ३१ जानेवारीला संपली असली तरी यात केवळ १७ कोटींपैकी ९ कोटी ग्राहकांनीच नवा प्लॅन सुरु केला असल्याचे लक्षात आले.

नव्या नियमांनुसार टीव्ही चॅनेल्सची निवड करावी याबाबत अनेक जणांच्या मनात संभ्रम आहे. म्हणूनच ट्रायकडून ३१ मार्चपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे.ट्रायकडून वाढविण्यात आलेल्या मुदतीमुळे आता ग्राहकांना या प्रक्रियेसाठी आणखी थोडा वेळ मिळणार आहे. ट्रायच्या नियमानुसार ग्राहक केवळ त्याच चॅनल्सचे पैसे देतील जी चॅनेल्स त्यांना पाहायची आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

Aprna

छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा रातोरात हटवला, शिवप्रेमींकडून संताप व्यक्त 

News Desk

पाकच्या ‘नापाक’ कारवाया सुरूच, शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

News Desk