HW News Marathi
देश / विदेश

राफेल करारापूर्वी अंबानींनी घेतली फ्रान्स संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट ?

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार राफेल विमान खरेदी करारात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आले आहेत. विविध दाव्यांमुळे, आरोप-प्रत्यारोपांमुळे देशात राफेल प्रकरण चांगलेच गाजत आहे. “उद्योगपती अनिल अंबानी हे राफेल विमान खरेदी करार होण्याच्या १५ दिवसांपूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटले होते”, असा नवा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने आज (१२ फेब्रुवारी) याबाबतचे वृत्त दिले आहे.

राफेल विमान करारामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला मिळालेल्या प्राधान्यावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. राफेल विमान खरेदी करार होण्याच्या १५ दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनी फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेटी घेतली असा गौप्यस्फोट, एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. २०१५ च्या मार्च महिन्यातील चौथ्या आठवड्यात अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच या बैठकीमध्ये फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जीन वेस ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जीन क्लॉड मेलेट हे सुद्धा सहभागी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंगारात सापडलेल्या नाण्याची किंमत दीड कोटी

News Desk

बुऱ्हाण वाणीला श्रद्धांजली वाहण्यावरून खोऱ्यात पुन्हा तणाव

News Desk

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आयईडी स्फोट २ जवान शहीद

News Desk