HW News Marathi
मुंबई

आज पश्चिम-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (१० फेब्रुवारी) सांताक्रृझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ यावेळेत जम्बो ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक असतांना सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. या मार्गावरील अप आणि डाउन सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर कुठलाही ब्लॉक असणार नाही.

सीएसएमटी आणि वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna

२२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी मुंबई मेट्रो बंद असणार, तसेच मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक

swarit

खातूंची कार्यशाळा आता नव्या जागेवर

swarit