HW News Marathi
अर्थसंकल्प

Budget 2019 : संसदेत आज पीयूष गोयल अंतरिम बजेट मांडणार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील शेवटचे अंतरिम अर्थसंकल्प पीयूष गोयल आज (१फेब्रुवारी) संसदे मांडण्यात येणार आहे. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडतील. निवडणुका तोंडावर असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.या अंतरिम अर्थसंकल्पात या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पाबाबत प्राप्तिकरात सूट देण्याची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढते काय, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल मात्र यंदा संसदेत सादर होण्याची शक्यता दिसत नाही. २०१९-२० सालासाठी तब्बल ६० हजार कोटींची तरतूद रोजगार हमी योजने करण्यात येणार आहे.

गतवर्षीपेक्षा ही वाढ ९ टक्के अधिक असेल.या शिवाय रोजगार हमीच्या दरात वाढ करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय ७९ दशलक्ष रुपयांची तरतूद करणार आहे. विविध कल्याणकारी योजनांसाठीही ३० हजार कोटींची तरतूद होऊ शकते. ३० दशलक्ष गरीबांना या योजनांचा थेट लाभ होतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk

Budget 2019 : २० रुपयांचे नवे नाणे, तर १ ते १० रुपयांचे नाणे नव्या रुपात येणार

News Desk

PFB : पीयुष गोयल अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार ?

News Desk