HW News Marathi
क्रीडा

मी स्पॉट फिक्सिंग केलीच नाही !

मुंबई | आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेट टीमचा बॉलर श्रीसंत यात दोषी आढळला होता. या प्रकरणी श्रीसंतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. “मी स्पॉट फिक्सिंग केलीच नाही, माझ्या तोंडून या सर्व गोष्टी वदवून घेण्यात आल्या होत्या. श्रीसंतच्या या विधानामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण आले असल्याचे म्हटले जाते आहे.”

श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपवरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केले होते. यानंतर संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. न्यायालायने त्याला प्रकरणी निर्दोष सुटका झाली असली तरी श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घालण्यात आली होती. आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीशांतने म्हटले आहे.

पुढे श्रीसंत असे म्हटले आहे की, ” माझ्यावर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मी स्पॉट फिक्सिंग केले याचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य नाही.”

श्रीसंत नेमके काय म्हणाला

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांबाबत श्रीसंत म्हणाला की, ” माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरु होती. तेव्हा मला दिल्ली पोलीसांनी धमकी दिली होती. तुझ्यासह कुटुंबियांना आम्ही त्रास देऊ आणि त्यांचे शोषण करू, असे मला दिल्ली पोलीसांनी सांगितले होते. त्यामुळे मी स्पॉट फिक्सिंगचा आरोप दिल्ली पोलीसांच्या दबावाखाली येऊन मान्य केला होता.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सीएम चषका’ला युवकांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद, १४ लाख लोकांचा सहभाग

News Desk

आम्हाला बीसीसीआयने सदस्यत्व द्यावे, तेलंगना क्रिकेट असोसिएशनची मागणी

News Desk

प्रशिक्षक रमेश पोवार यांचा ३ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण

News Desk