नवी दिल्ली | सेक्सिस्ट कॉमेंट्स करणाऱ्यांना राजकारणात स्थान नाही, असे म्हणत अभिनेत्री आणि भाजप नेत्या हेमा मालिनी यांनी भाजपच्याच नेत्यांना सुनावले आहे. काँग्रेसने काहीच दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती केली होती. यानंतर अनेक भाजप नेत्यांकडून प्रियांका गांधींसह काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका तसेच वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली. विशेषतः प्रियांका गांधी यांच्या सुंदरतेवरून अनेक विधाने केली गेली.
BJP's Kailash Vijayvargiya: Unke paas leader nahi hain, isliye wo chocolatey chehre ke madhyam se chunav mein jaana chahte hain. Ye unke andar atmavishwas ke kami ko dikhata hai… Koi Kareena Kapoor ka naam chalata hai, koi Salman Khan ka, kabhi Priyanka Gandhi ko le aate hain. pic.twitter.com/GhVWrnuRbR
— ANI (@ANI) January 26, 2019
“काँग्रेसकडे चेहरा नाही म्हणूनच आता काँग्रेस चॉकलेटी चेहरे समोर आणत आहे. कधी सलमान खान तर कधी करीना कपूर काँग्रेसकडून निवडणुक लढणार असल्याच्या बातम्या रंगत आहेत. आता तर प्रियंका गांधींना राजकारणात आणण्यात आले आहे” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले होते. हेमा मालिनी यांनी अशी विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सेक्सिस्ट कॉमेंट्स करणाऱ्यांना राजकारणात काहीही स्थान नाही, असे हेमा मालिनी यांनी सुनावले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.