HW News Marathi
अर्थसंकल्प

PFB : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज (३१ जानेवारी) सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (१ फेब्रुवारी) शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे दोन्ही सभागृहांत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेच्या ऐतिहासिक केंद्रीय कक्षात लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना संबोधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या ‘अर्थसंकल्पीय’ अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे.

देशातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना या बजेटमधून काय दिलासा देणारी योजना असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वैयक्‍तिक आयकर सवलतीची मर्यादा वाढविण्याचा निर्णयदेखील घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यापाठोपाठ अरुण जेटली यांना उपचारासाठी अमेरिकेला जावे लागले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल.

या पार्श्‍वभूमीवर पीयूष गोयल यांच्याकडे हंगामी अर्थमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. केंद्रातील मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने त्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंतच्या म्हणजे येत्या तीन-चार महिन्यांच्या खर्चाची तरतूद सरकारला अंतरिम अर्थसंकल्पात करावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री 

News Desk

#Budget 2019 : सरकारकडून असंघटित कामगारांना मिळणार पेन्शन

News Desk

४५ वर्षात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सितारमन दुसऱ्या महिला

Atul Chavan