HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली | अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची २९ जानेवारीला होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्याने निर्माण केलेल्या घटनापीठातील न्यायमूर्ती एस. ए. बोबडे अनुपस्थित राहणार आहेत. परंतु या प्रकरणाची सुनावणी नक्की कोणत्या तारखेला होणार हे अद्याप स्पष्ट नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी (२५ जानेवारी) पाच सदस्यी घटनापीठाची नव्याने स्थापना केली होती. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भुषण, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा समावेश केला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅडिशनल रजिस्ट्रार (लिस्टिंग) यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार घटनापीठामध्ये असलेले न्यायमूर्ती बोबडे अनुपस्थित राहणार आहेत. यामुळे २९ जानेवारीला अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार नाही.

याआधी झालेल्या सुनावणी वेळी न्यायमूर्ती उदय ललित यांनी पाच सदस्यीय घटनापीठातून माघार घेतली होती. त्यामुळे नवीन घटनापीठाची नियुक्ती होईपर्यंत अयोध्या प्रकरणाची सुनावणीची तारीख पुढे ढकलली होती. परंतु नव्याने घटनापीठाची नियुक्ती केल्यानंतरही न्यायमूर्तींच्या अनुपस्थितमुळे सुनावणी पुढे गेली असली तरी नक्की कोणत्या तारखेला सुनावणी होणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयटी रिटर्न्स भरण्याकरिता पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करणे अनिवार्यच

News Desk

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्याहून अटक

Gauri Tilekar

#Article370Abolished : काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची मिळाली परवानगी

News Desk