नवी दिल्ली | “देशात गेल्या ७० वर्षात एकाही ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आले नाही, याबद्दल योगगुरू बाबा रामदेव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा शिवकुमार स्वामीजी यांना पुरस्कार मिळायला हवा होता. तसेच पुढच्या वर्षी किमान एखाद्या संन्याशाला ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी माझा केंद्र सरकारकडे आग्रह असेल,” असे रामदेव बाबा म्हणाले.
Yog Guru Ramdev: Durbhagya hai 70 saalo mein ek bhi sanyasi ko Bharat Ratna nahi mila. Maharishi Dayananda Saraswati, Swami Vivekananda ji, ya Shivakumara Swami ji. Mai Bharat sarkar se aagrah karta hu ki agli baar kam se kam kisi sanyasi ko bhi Bharat Ratna diya jaye. (26-1-19) pic.twitter.com/KMh5p4aJe9
— ANI (@ANI) January 27, 2019
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ची घोषणा करण्यात आली होती. यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.