HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | ‘समृद्धी द्रुतगती महामार्ग’ महत्त्वकांक्षी प्रकल्प

मुंबई | या समृद्धी द्रुतगती महामार्गाचा हेतू हा प्रवासी आणि मालवाहतुक जलदगतीने होण्यासाठी मार्गाची मुर्हतमेठ रोविण्यात आली आहे. हा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वकांक्षी मानला जातो. या मार्गामुळे हा समृद्धी द्रुतगती महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यातून जात असून तो नागपूरला मुंबईपर्यंत तर जोडेलच पण, त्यामुळे हे सर्व जिल्हे व अन्य १४ जिल्हे मुंबईतील JNPT सारख्या देशातल्या एका सर्वात मोठ्या मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये देखील वाढ होईल.

या द्रुतगती मार्गामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थांच्या आधारे दुर्गम भागांत रस्ते पोहचवण्याचे महत्वाचे काम अंतर्भूत आहे. या द्रुतगती महामार्गामुळे देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोचता येईल. या ठिकाणांजवळ नोकरी-व्यवसायाच्या, आरोग्य सेवेच्या, व्यापाराच्या, उद्योग-धंद्या, शिक्षणाच्या संधी आणि इतर गरजेच्या सेवा अगदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

महामार्गावरील सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी राज्यमार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे विकसित केले जाईल. यामुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे १४ जिल्हेही या मार्गाशी जोडले जातील. म्हणजे राज्यातले एकूण २४ जिल्हे या द्रुतगती मार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. या द्रुतगती महामार्गालगत असलेली महत्त्वाची पर्यटन स्थळंही जोडली जाणार आहेत.

समृद्धी द्रुतगती महामार्गाती महत्त्वाच्या गोष्टी

  • द्रुतगती महामार्ग ७०० कि.मी. लांबीचा असेल आणि १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना थेट जोडेल.
  • महामार्गावरील वेगमर्यादा १५० कि.मी. असल्यामुळे नागपूर आणि मुंबई यामधला प्रवास केवळ ८ तासांचा होईल.
  • नागपूर ते औरंगाबाद हे अंतर ४ तासांत तर औरंगाबाद तेमुंबई हे अंतर पुढच्या फक्त ४ तासांमध्ये पार होऊ शकेल.
  • महामार्गामुळे अनेक औद्योगिक क्षेत्रे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जसे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा व जालना येथील ड्राय पोर्ट आणि मुंबईचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर ही सर्व ठिकाणे एकमेकांना जोडली जातील.
  • हा महामार्ग १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही.
  • महामार्गाच्या दोन्ही बाजूला पूरक रस्ते (सर्व्हिस रोड्स) असतील. हे रस्ते द्रुतगतीमार्गाच्या खालून जाणाऱ्या भुयारी मार्गाशी जोडले जातील.
  • या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे, वाहनांसाठी ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग इतके महामार्गाच्या खालून जाणारे रस्ते अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसेच स्थानिक जनतेलाही महामार्गाचा कोणताच अडथळा त्यांच्या दळणवळणात होणार नाही आणि अपघात टाळले जातील.
  • महामार्गावर सर्वत्र लँडस्केपिंग केले जाईल. बोगद्यांमध्ये, भुयारी मार्गावर दिवे, तसेच पुलाचे सुशोभीकरण, रस्त्यांवरचे सुधारित दिवे आणि डिजिटल दिशादर्शक चिन्हांचा वापर होईल.
  • जिथे जिथे शक्य आहे तिथे स्थानिक संसाधनांचा वापर केला जाईल, तसेच रस्ते बांधणीसाठी उर्जाप्रकल्पातील राख आणि प्लास्टिकचाही वापर केला जाईल. याबरोबरच महामार्गाच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचेही संकलन करून त्याचा पुनर्वापर केला जाईल.
  • या द्रुतगती महामार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.
  • हा द्रुतगती महामार्ग “शून्य अपघात महामार्ग” असेल. यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यानी नजर ठेवली जाईल आणि प्रत्येक ५ कि.मीवर दूरध्वनी सेवा असेल, ज्यामुळे जर अपघात झालाच तर किंवा इतर निकडीच्या प्रसंगांमध्ये परिस्थितीची सूचना लवकरात लवकर देता येऊ शकेल.
  • या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन्स आणि वीज वाहतुक सुविधा टाकल्या जातील.
  • तसेच कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये, नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धसदृश परिस्थितीमध्ये काही काळासाठी या मार्गाच्या काही भागाचे रूपांतर विमान उतरवण्यासाठी तात्कालिक धावपट्टीमध्ये करता येऊ शकेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

News Desk

पश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी

News Desk

का झाले कारगिल युद्ध ?

News Desk