HW News Marathi
राजकारण

होय मी बंडखोर !

नवी दिल्ली |खरे बोलणे जर बंडखोरी असेल तर होय मी बंडखोर आहे. पण मी सत्य आणि तत्वाशी तडजोड करणार नाही,” अशा शब्दात भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी कोलकत्ता येथील बिग्रेड मैदानावर आयोजित महाआघाडी भाजपला सडेतोड उत्तर दिले.

काही महिन्यांपासून भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे पक्षाविरोधात बोलत आहेत. सिन्हा यांनी आज (१९ जानेवारी) चक्क कोलकातामधील भाजप विरोधकांच्या सभेला उपस्थितीत दर्शविली. यामुळे भाजपकडून सिन्हा यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून सिन्हा हे संधी साधू आहेत, अशा शब्दात भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांनी टीका केली आहे. पुढे राजीव रूडी असे देखील म्हणाले की, काही लोकांच्या इच्छा मोठ्या असतात, सिन्हा यांच्याबाबत पक्षाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल.

राजीव प्रताप रूडी नेमके काय म्हणाले

“काही माणसे इतकी चलाख असतात की ती भाजपची खासदारकी मिळवून त्यातून लाभ मिळवण्याचे काम करतात, आपल्यावर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई होऊ नये याची ते खबरदारी घेत असतात त्याचवेळी ते इतके संधीसाधू असतात की ते विरोधकांच्या सभामंचकांवर जात असतात. भाजप याची नक्कीच दखल घेईल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने देशाला नवी दिशा मिळाली !

News Desk

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘रिट्रीट’मध्ये आमदारांची बैठक

News Desk

“सुरज परमार यांच्या डायरीवर एसआयटी स्थापन करा”, संजय राऊतांची सरकारकडे मागणी

Aprna