HW News Marathi
देश / विदेश

‘पीएफ’मुळे नोकरदारांची चिंता वाढली

मुंबई | देशातील लाखो पगारदार मध्यमवर्गी नोकरदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण या नोकरदारांचे पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडाचे कोट्यवधी रुपये बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शियल सर्विसेस (IL&FS) या ग्रुपवर जवळपास १५ ते २० हजार कोटीचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. तर ही कंपनी सुद्धा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे बोले जात आहे.

सध्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीवर ९१ हजार कोटींचे कर्ज आहे. त्यात ६१ टक्के थेट बँकांचे कर्ज, तर उर्वरित रकमेत डिबेंचर्समार्फत उभारलेल्या कर्जाचा समावेश असल्याची माहिती रेग्युलेटरी फाइलिंगच्या माध्यमातून समोर आली आहे. ‘IL&FS’ ला मिळालेल्या ट्रिपल A मानांकनाच्या आधारावर सल्लागारांनी या कंपनीचे बाँड्स विकत घेण्याचा सल्ला सरकारला दिला होता. असे मानांकन असलेल्या कंपनीतली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. ‘IL&FS’ मध्ये पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदाचा सर्वाधिक पैसा अडकला आहे. यामुळे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक झालेल्या २० हजार कोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवघ्या चौदा मिनिटांत अमेरिका नष्ट करणार, उत्तर कोरियाची धमकी

News Desk

“सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली”, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

News Desk

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटीलांनी सांगितलं भेटीचं कारण!

News Desk