HW News Marathi
क्राइम

भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून जप्त केला मोठा शस्त्रसाठा

मुंबई | कल्याण गुन्हे शाखेकडून भाजपचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९ वर्षे) यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. आता कुलकर्णी यांच्या दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कसा ? कशासाठी ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, भाजप पदाधिकाराच्या दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी यांचे तपस्या फॅशन हाऊस नावाचे दुकान आहे. त्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा आता पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मात्र, धनंजय कुलकर्णी हे भाजपचे पदाधिकरी असूनही अद्याप भाजपकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल १८० प्रकारची शस्त्रे जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले विष..

News Desk

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

Aprna