अहमदाबाद | देशभरात आज मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना गुजरातमध्ये मात्र या दिवशी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर १०० हून अधिक जण पतंग उडवताना छतावरून खाली पडले आहेत.
Gujarat: Birds injured during the kite flying in #MakarSankranti receive medical care in Ahmedabad. Vinay Shah, Trustee Jivdaya Charitable Trust says, "Yesterday we received 472 birds & today we’ve received 230 birds. Initially, we give first aid & surgery is done when required." pic.twitter.com/OrVS3KguOq
— ANI (@ANI) January 15, 2019
७०० हून अधिक पक्षांना पतंगबाजीचा फटका
पतंगांच्या मांज्यामुळे सोमवारी (१४ जानेवारी) ४७२ तर मंगळवारी (१५ जानेवारी) २३० पक्षी जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्या पक्षांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.