नवी दिल्ली | समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (१२ जानेवारी) घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदमुळे भाजपची झोप उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सप आणि बसप आघाडी करत असल्याची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. सप आणि बसपच्या या आघाडीच्या घोषणेनेनंतर ‘आता या पत्रकार परिषदेने पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांची झोप उडाली असेल’ असे खोचक विधान मायावती यांनी केले आहे.
सप-बसपच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- संयुक्त पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या,”सप-बसपही पत्रकार परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह दोन्ही गुरु-शिष्याची झोप उडविण्यासाठी होत आहे.
- मायावती म्हणाल्या, सप आणि बसपच्या या पत्रकार परिषदेने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची झोप उडणार आहे.
- सामान्यांच्या भावनांची पूर्ण आदर करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सप-बसपने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- आगामी निवडणुकांसाठीच्या बसप आणि सपच्या या आघाडीमुळे भाजप केंद्रात सत्ता स्थापन करण्यापासून रोखले जाऊ शकते.
- भाजपच्या अत्याचारांपासून जनतेला मुक्त करण्यासाठी सप-बसपने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असे अखिलेश यादव म्हणाले.
- वेळेनुसार सप आणि बसप एकत्र अधिक मजबूत होतील, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला
- बसप-सप आघाडीचे जागावाटप :उत्तर प्रदेशातील एकूण जागा : ८०
बसप : ३८ सप : ३८
इतर : २
काँग्रेस २ जागा – अमेठी आणि रायबरेली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.