HW News Marathi
राजकारण

बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर निवासात तातडीची बैठक

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१० जानेवारी) सलग तिसरा दिवस आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर निवास येथे बैठक होणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे नुकतेच महापौर बंगल्यावर दाखल झाले आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

महापौरांनी आम्हाला चर्चेसाठी बोलविले आहे. जी काय चर्चा होईल ती कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात येईल. मग जो काही निर्णय असेल तो कामगार घेतील.

– शशांक राव, बेस्ट कृती समिती अध्यक्ष

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या सलग तीन दिवस सुरु असलेल्या संपामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. बेस्ट प्रशासनाने बेस्ट कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई केली असून या कर्मचाऱ्यांना वसाहती खाली करण्यास देखील सांगितले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. म्हणूनच, या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर निवासावर तातडीची बैठक बोलवण्यात आली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांत मोठे बदल

News Desk

समीर भुजबळांना जामीन मंजूर

News Desk

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी राज्यातील सर्वात मोठा घोटाळा केला उघड…

News Desk