HW News Marathi
मनोरंजन

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

मुंबई | मकरसंक्रांत जस जशीजवळ येते, तस तशी हलव्यांच्या दागिन्यांनी बाजारपेठा सजल्या पाहला मिळाल्या आहेत. संक्रांतीमध्ये हलव्यांच्या दागिन्यांचे खास महत्त्व असते. नवीन लग्न झालेल्या मुलीला आणि जावयाला हलव्याच्या दागिन्यांनी परिधान केले जातात. हे दागिने परिधान केल्यानंतर तिळगूळ द्यावा व भरभरून आशीर्वाद द्यावा, अशी आपल्याकडे परंपरा असल्याचे म्हटले जाते.

या परंपरेला आधुनिकतेशी मेळ घालीत वैविध्यपूर्ण हलव्याचे दागिने सध्या बाजारपेठेत दाखल झाले असून, पारंपरिक हार, कानातलेआणि नारळ हलव्यापासून तयार केलेल्या प्रतिकृतींना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. विकतचे दागिने घेण्याबरोबरच आपल्या लाडक्या लेकी, सुनांसाठी स्वत:च्या हाताने दागिने बनवण्याची लगबगही अनेकींच्या घरी दिसून येत आहे. त्यासाठी मात्र महिन्याभरापासून तयारी सुरू होती.

या हलव्याच्या दागिन्यांवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात हलव्याचे दागिने खरेदी करण्यात आले असून, दागिन्यांच्या किमतीत बदल झालेला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. महिलांचे दागिने १० वस्तूंचा सेट ६५० रुपये, लहान मुलांचा सेट २३१ रुपये, पुरुषांचा सेट ४०० रुपये असे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधुरा प्रवास..त्याचा आणि तिचाही….

News Desk

डॉन समीर धर्माधिकारी

News Desk

सेक्सचे चार लक्षणे

News Desk